सॅमसंग गॅलक्सी एस-3 / सॅमसंग गॅलक्सी एस-3 देणार अँपलला टक्कर, किंमत 38,000

May 06,2012 07:36:12 AM IST

लंडन: दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी एस-3 गुरुवारी रात्री लंडनमध्ये लाँच केला. भारतात हा फोन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. हा फोन आल्यानंतर अँपलच्या आयफोन, एचटीसीच्या वन-एक्स व इतर स्मार्टफोनला जबरदस्त टक्कर मिळणार आहे. सॅमसंग मोबाइलचे अध्यक्ष जे. के. शिन यांच्या मते या स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्ही जगभरात धूम करू. हा फोन सर्व स्मार्टफोन व आयफोनचा किलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. याअगोदर आम्ही गॅलक्सी एस-2 च्या साह्याने बाजारपेठेतील मोठा हिस्सा ताब्यात घेतला आहे.
सॅमसंगच्या फोनची वैशिष्ट्ये
स्क्रीन : 4.8 इंच (1280 720 पिक्सेल एचडी) गॅलक्सी एस-2 हा फोन 22 टक्के मोठा.
प्रोसेसर : 1.4 गीगाहर्ट्झ.
मेमरी : 32 जीबी (64 जीबी एक्स्पांडेबल)
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड 4.0 (आइस्क्रीम सँडविच)
कॅमेरा : 8 मेगापिक्सेल, फ्रंट 1.9 मेगापिक्सेल.
व्हाइस कमांड : एस कमांडच्या माध्यमातून आवाजाने होणार काम. ‘कॅमेरा ऑन’ म्हणा आणि फोटो घेण्यासाठी कॅमेरा तयार.
आय ट्रॅकिंग : जोपर्यंत फोनच्या स्क्रीनकडे पाहिले जाईल तोपर्यंत फोनचा लाइट बंद होणार नाही.
किंमत : भारतीय बाजारात याची किंमत 38 हजारांपर्यंत असू शकते.

X