आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सॅमसंगचे नवे स्मार्टफोन करणार ‘सेल्फी’ची इच्छापूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोबाइलकरांमधील ‘सेल्फी’ची क्रेझ कॅश करताना सॅमसंगने गॅलक्सी ए ३ आणि गॅलक्सी ए ५ या आकर्षक स्मार्टफोनबरोबरच मध्यम श्रेणीमध्ये गॅलक्सी इ सिरीज मालिकेमध्य गॅलेक्सी इ ५ आणि गॅलेक्सी इ ७ अशा चार स्मार्टफोनची भेट नवीन वर्षाला दिली आहे. हे नवीन स्मार्टफोन २० जानेवारीपासून बाजारात उपलब्ध होणार आहेत.

सॅमसंगने गॅलक्सी ई मालिकेतील स्मार्टफोन जागतिक पातळीवर उपलब्ध केले असून त्यांचे अनावरण मुंबईत एका खास समारंभात करण्यात आले. इ-सिरीज मालिकेतील फोन हे खास तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून आणले असल्यामुळे ते अतिशय कॉम्पॅक्ट आणि त्यांची ‘सेल्फी’च्या इच्छा पूर्ण करणार आहेत.

गॅलक्सी इ ५ आणि इ ७ स्मार्टफोन अनावरण होणारा भारत हा पहिला देश असून त्या माध्यमातून सॅमसंगने जागतिक स्तरावर आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यातूनही ड्युएल सिम स्मार्टफोनमध्ये मध्यम श्रेणीतल्या स्मार्टफोनमध्ये आणखी बळकटी मिळाली असल्याचे सॅमसंग इंडियाच्या मोबाइल आणि आयटी विपणन विभागाचे उपाध्यक्ष असीम वारसी यांनी सांगितले.

असे आहेत हे स्मार्टफोन
* आजपर्यंतचे सर्वांत सडपातळ स्मार्टफोन्स, संपूर्ण धातूची डिझाइन आहे.
* ६.७ मिमी आणि ६.९ मिमी सडपातळ आहेत.
* सुपर अ‍ॅमोल्ड डसि्प्ले, अ‍ॅडाप्टिव्ह डसि्प्ले तंत्रज्ञानामुळे पूर्ण काँट्रास्टद्वारे चांगली छायाचित्रे काढणे एकाच वेळी अनेक कामे आणि ब्राऊझिंगचा अनुभव देणारा क्वाडकोअर १.२ गीगाहर्ट्झचा प्रोसेसर
* अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड, प्रायव्हेट मोड, मल्टसि्क्रीन
* वापरकर्त्याच्या आजूबाजूच्या वातावरणानुसार आवाजाची पातळी, प्रकार ओळखून त्यानुसार जुळवून घेणारा खास ऑडिओ

किंमत
सॅमसंग गॅलक्सी ए ५ २५,५०० रु.
गॅलक्सी ए ३ २०,५०० रु.
गॅलक्सी इ ५ १९,३०० रु.
गॅलक्सी इ ७ २३,००० रु.
या रंगांत उपलब्ध : पर्ल व्हाइट, मिडनाइट ब्लॅक, शॅम्पेन गोल्ड