आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केला Note3 Neo स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण कोरियाच्या Samsung कंपनीने Samsung साउथवेस्ट फोरममध्ये एक स्मार्टफोन आणि दोन टॅब लॉन्च केले आहेत. यात Galaxy note3 Neo स्मार्टफोन, Galaxy टॅब 3Neo आणि प्रो सिरिजच्या टॅबलेटचा समावेश आहे. हे तिन्ही प्रोडक्ट या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारापेठेत दाखल होतील. यासोबतच Galaxy Grand Neo ही लॉन्च करण्यात आला आहे, जो मंगळवारपासून उपलब्ध झाला आहे. याची किंमत 18,450 रूपये ठेवण्यात आली आहे.

वैशिष्टे
-या स्मार्टफोनची किंमत 40,900 रूपये असून भारातीय बाजारपेठेसाठी Note3ची किंमत 45 हजार रूपये ठेवण्यात आली आहे.
-यात 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
-मागच्या बाजूला लेदर फिनिश असणारा हा मोबाइल ब्लॅक, व्हाइट आणि मिंट ग्रीन रंगात उपलब्ध आहे.
-रॅम - 2Gb
-इंटरनल मेमरी- 16Gb आणि 64Gb मेमरी कार्डची सुविधा
-5.5 इंच एचडी सुपर मोल्ड स्क्रीन.
-प्रोसेसर -हॅक्जाकोर, ए ड्यूअल 1.7 Ghz आणि ए 7 क्वॉड 13.Ghz.
-वजन- 163ग्रॅम

विशेष बाब
Note3मध्ये असणारे फिचर्स Galaxy note3 Neoमध्ये देण्यात आले आहेत. सर्व एअर कमांड फिचर्स अ‍ॅक्शन मेमो, स्क्रॅप बुकर, एस फाउंडर पॅन विंडो हे फिचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त...