आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने आयपीएलसाठी लॉंच केला 'जॉय' स्‍मार्ट टीव्‍ही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आयपीएल आणि आगामी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा लक्षात घेऊन सॅमसंग या कोरिअन कंपनीने आज भरताच्या बाजारपेठेसाठी 'जॉय' ही फ्लॅट पॅनल टीव्हीची नवी श्रेणी सादर केली. ज्यांनी याआधी टीव्ही खरेदी केला आहे, त्यांना नव्या श्रेणीस अनुकूल बदल करता यावेत यासाठी एक स्मार्ट कीट कंपनीचे उपाध्यक्ष एस. आर किम यांनी सादर केले.

कंपनीचे उपाध्यक्ष एस.आर किम यांनी परिषदेत सांगितले की, चालू वर्षासाठी एलईडी टीव्हीची एक मालिकाच आम्ही उपलब्ध करत आहोत. आर्द्रतारोधक, वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे होणारे नुकसान आणि ग्रामीण भागात वीज कोसळल्यास होणारी हानी यापासून रक्षण करणारी यंत्रणा नव्या मालिकेत आहे. जागतिक बाजारात कंपनीचा हिस्सा ५६ टक्के आहे आणि तो यंदा १५ -२० टक्के वाढेल.

नव्या मालिकेतील स्मार्ट टीव्हीत ७५० जागतिक आणि २५० स्थानिक अ‍ॅप्स ग्राहकांना वापरता येतील. तसेच टीव्हीचे कार्यक्रम सेल फोनवर पाहण्याची सुविधा आहे. स्मार्ट टीव्ही ३७९०० रुपयापासून ते तीन लाख ६७ हजार रुपये यादरम्यान आहेत.