आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवघ्‍या 4280 रुपयांत मिळणार सॅमसंगचा \'रेक्स\' स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सॅमसंग कंपनीने स्मार्टफोनची 'रेक्स' सीरीज गुरुवारी भारतीय बाजारात सादर केली. रेक्सची किंमत 4, 280 ते 6,500 रुपयांपर्यंत आहे. नोकियाच्या आशा सीरीजला टक्कर देण्याच्या इराद्याने सॅमसंगने रेक्स सीरीज सादर केली आहे.

सॅमसंगचे उपाध्यक्ष असीम वारसी यांनी सांगितले की, सॅमसंग मोबाईलच्या एकूण विक्रीत 'फीचर्स फोन' ची भागीदारी 70 टक्के आहे. 'रेक्स' सीरीजच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंग, गेम्स आणि इंटरनेट सर्फिंग करणार्‍या तरुणाईला आकर्षित करण्‍याकडे कंपनीचा अधिक भर राहणार असल्याचेही वारसी यांनी सांगितले.


सॅमसंगने रेक्स सीरीजचे चार मॉडेल-
रेक्स 60- 4,280 रुपये
रेक्स 70- 4,570 रुपये
रेक्स 80- 5,270 रुपये
रेक्स 90- 6,490 रुपये


वरील मॉडेल रिटेल आऊटलेटमध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होतील. रेक्स फोन ड्यूअल सिम तसेच टच स्क्रीन आहेत. जावा प्लेटफॉर्मवर रेक्सचे काम चालते. या फोनमध्ये फेसबुक, मेसेंजर सारख्या चॅट ऑन आणि जी टॉक तसेच ऑपेरा अ‍ॅप्लिकेशनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतासह चीन, आफ्रिका, साऊथ अमेरिका आणि सीआयएसमध्येही उपलब्ध करण्‍यात येणार आहे.