आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Launches World\'s First Smartphone With Curved Screen

जगातील पहिला राऊंड कर्व्ह डिस्प्ले स्मार्टफोन लॉंच, सॅमसंगची इतरांवर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल (दक्षिण कोरिया)- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने राऊंड कर्व्ह डिस्प्ले असलेला जगातिल पहिला स्मार्टफोन आज (बुधवार) लॉंच केला. गॅलेक्सी नोटच्या स्वरूपात हा स्मार्टफोन सादर करण्यात आला असून न फुटणाऱ्या स्क्रिनसह वेगवेगळ्या प्रकारातील स्क्रिनची चॉईस आता सॅमसंग ग्राहकांना मिळणार आहे.

हायएंड स्मार्टफोन बाजारपेठेत सध्या मंदिचे वातावरण आहे. या बाजारपेठेतील आपली पकड मजबूत करण्याचा उद्देश समोर ठेऊन सॅमसंगने जगातील पहिला राऊंड कर्व्ह डिस्प्ले असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. यासह सॅमसंगने अॅपल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांवर नवनवीन प्रॉडक्ट सादर करण्यात मात केली आहे.

नवीन गॅलेक्सी राऊंडसाठी कर्व्ह टच स्क्रिन मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता यापूर्वी सॅमसंगकडे नव्हती असे सांगून हाना दाईतू सेक्युरिटी अॅनॅलिस्ट नाम दाई-जोंग म्हणाले, की न फुटणाऱ्या स्क्रिनसह वेगवेगळ्या प्रकारातील स्क्रिन स्मार्टफोनसाठी उपलब्ध होण्याच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल आहे. परंतु, सध्याच्या बाजारपेठेचा विचार केल्यास हे प्रॉडक्ट केवळ सिम्बॉलिक ठरण्याची शक्यता जास्त आहे. कर्व्ह डिस्प्लेसह इतर युनिक फिचर्स येत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन जगात उचलण्यात आलेले हे नवे पाऊल कितपत यशस्वी ठरेल, हे आताच सांगता येणार नाही.

या स्मार्टफोनच्या इतर फिचरसंदर्भात जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...