आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samsung Launches World's Largest Curved UHD TV, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Samsung ने सादर केला जगातील पहिला 105 इंचाचा बेंडेबल टीव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung ने आपला बहुचर्चित Curved UHD TV (कर्व्ड अल्ट्रा हाय डेफिनेशन युएचडी) सादर केला आहे. जगातील पहिला बेंडेबल (कर्व्ड) टीव्ही असून तो 105 इंचाचा आहे. बर्लिन येथे सुरु असलेला इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर प्रॉडक्ट शो 'आयएफए 2014' मध्ये Samsung ने आपला लेटेस्ट फीचर्सने अद्ययावत असलेला टीव्ही सादर केला आहे.

युएसडी टीव्ही 'कर्व्ड' टीव्हीची युरोपिय बाजारात सर्वाधिक मागणी असल्याचे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ संचालक मायकल जोलर यांनी यावेळी सांगितले. टीव्हीची किमत क‍िती असेल याबाबत मात्र जोलर यांनी खुलासा केला नाही.

Samsung Curved UHD TV चा स्क्रीन रेझोल्युशन 11 मिलियन पिक्सल (5120X2160) आहे. स्क्रीनचा रेशियो 21:9 इतका असून टीव्हीसोबत कर्व्ड साउंडबारही देण्यात आले आहे. साउंडबारला टीव्हीसोबत स्टॅंडवर उभे केले जावू शकते. युरोपमध्ये हा टीव्ही लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

(फोटोः बर्लिन येथील इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये Samsung ने बेंडेबल टीव्ही सादर केला.)

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Samsung चा बहुचर्चित बेंडेबल टीव्हीची फोटो आणि व्हिडिओ..