सॅमसंग गॅलेक्सीच्या खरेदीसाठी / सॅमसंग गॅलेक्सीच्या खरेदीसाठी उडाली नागरिकांची झुंबड

Jul 04,2011 05:58:27 PM IST

नवी दिल्ली - सॅमसंग गॅलेक्सी मोबाईलच्या विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या मोबाईलच्या खरेदीसाठी जगभरातील लोक तुटून पडले आहेत. जगभरात दीड सेकंदानंतर एक मोबाईल विकला जात आहे. गेल्या ५५ दिवसांत ३० लाख हँडसेट विकले गेले आहेत. खपांचा विक्रम करणारा हा मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी एस२ हा आहे. या मोबाईलने विक्रीच सॅमसंगचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, या हँडसेटची युरोपात मोठी क्रेझ आहे. इंग्लंडमध्ये या हँडसेटला सर्वश्रेष्ठ मोबाईलचा पुरस्कार मिळाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये या मोबाईलने ३६ टक्के बाजार व्यापला आहे. गॅलेक्सी ऍड्रॉइड आधारित असून, टचस्क्रीन आहे. या मोबाईलची १६ जीबी ची मेमरी असून, ८ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर कितीही कॉल तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता.

X