आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगचा नोट 10.1 फॅब्लेट लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेउल - अ‍ॅपलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गुरुवारी गॅलक्सी नोट 10.1 फॅब्लेट लाँच केला आहे. टॅब आणि स्मार्ट फोनची एकत्रित वैशिष्ट्ये असलेल्या या फॅब्लेटचे ब्रिटन, अमेरिका आणि दक्षिण कोरियात लाँचिंग झाले. भारतात कंपनीच्या स्टोअरमध्ये ऑर्डर दिल्यास फॅब्लेट उपलब्ध होईल. त्यासाठी 2 हजार रुपये भरून फॅब्लेट बुक करता येईल, अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. टॅबचा हा मोठा आणि चांगला प्रकार लोकांना आवडेल, असा दावा सॅमसंगने केला आहे. टॅबच्या बाजारपेठेत कंपनीचा वाटा फक्त 9.9 टक्के आहे. सॅमसंगने या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत फक्त 44 लाख टॅब विकले आहेत. अ‍ॅपलने मात्र याच काळात तीन कोटी आयपॅडची विक्री केली आहे. अ‍ॅपलचा बाजारपेठेतील वाटा 64 टक्के आहे.
वैशिष्ट्ये : नोट टेकिंग, स्टायलिश पेन
- स्प्लिट स्क्रीनमुळे दोन वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सवर काम करता येते.
- अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आणि स्पीडसाठी 1.4 गीगाहर्ट्झ कॉड कोअर प्रोसेसर.
- 5 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 1.9 एमपीचा फ्रंट कॅमेरा.
- वापरणा-याच्या डोळ्यावर लक्ष ठेवणारे संवेदक. यामुळे फोन आपोआप स्टँडबाय मोडमध्ये जात नाही.
- 19.9 जीबी मेमरी आणि वायफाय फंक्शन्ससह टॅबची किंमत 28 हजार 243 रुपये.
- 32 जीबी मॉडेलसाठी 31 हजार रुपये मोजावे लागतील.