Home | Business | Gadget | samsung s +, gadgets, business

गॅझेट भेट- एस प्लस

किरण जाधव | Update - Apr 11, 2012, 06:11 AM IST

सॅमसंगने 'गॅलक्सी' या श्रेणीखाली अनेक चांगले मोबाइल्स देण्याचा सपाटा लावला आहे.

 • samsung s +, gadgets, business

  सॅमसंगने 'गॅलक्सी' या श्रेणीखाली अनेक चांगले मोबाइल्स देण्याचा सपाटा लावला आहे. या 'गॅलक्सी' फोन्सचा आत्मा म्हणजे 'अँड्रॉइड'. हे फोन इतर फोनपेक्षा कशा प्रकारे उत्तम आहेत, हे सांगण्याची आता वेगळी गरज नाही. पण उत्तम ऑपरेटिंग सिस्टिमबरोबर त्याला सपोर्ट करणारी चांगली सिस्टिमदेखील असावी लागते. सॅमसंगचे 'गॅलक्सी'र्शेणीचे फोन्स याचे उत्तम उदाहरण आहे. या फोन्सपैकी सुवर्णमध्य साधणारे काही थोडकेच फोन्स आहेत. साधारण 9,000 चा गॅलक्सी 'Y' आणि 33,000 चा सॅमसंग SII, अशा जास्त खप असणार्‍या मॉडेल्सचा सुवर्णमध्य ठरला आहे 'सॅमसंग गॅलक्सी एस प्लस' (9001) हा फोन. आपल्या जुन्या 'S' या व्हर्जनपेक्षा अधिक जलद, अधिक चांगली क्षमता असणारा हा फोन आहे.
  या फोनची काही महत्त्वाची फीचर्स :
  • 1.4 GHz चा प्रोसेसर - एफ.एम.
  • HSPA + 14.4 MbPs हायस्पीड ट्रान्सफर - जी. पी. एस.
  • 2.3 जिंजरबोर्ड अँड्रॉइड - गुगल टूलबार
  • 5.0 कॅमेरा
  • 4 इंच x 16 इंच कलर सुपर अँमोएलईडी (AMOLED) डिस्प्ले
  • उत्तम बॅटरी लाइफ
  • ब्ल्यूटूथ, यूएसबी
  एका स्मार्टफोनला जेवढी स्मार्ट फीचर्स असावीत, तेवढी सर्व या फोनमध्ये आहेत. शिवाय याच्या उत्तम कॉन्फिगरेशनमुळे सॅमसंग व अनेक अँड्रॉईड अँप्स यावर उत्तम प्रकारे चालतात. उत्तम कनेक्टिव्हिटी स्पीडमुळेच बिझनेस ओरिएंटेड लोकांसाठी हा फोन युजफुल ठरला आहे. इतर गॅलक्सी फोनप्रमाणे या फोनचे डिझाइन स्मार्ट असले तरी युनिक असे वाटत नाही. पण पुन्हा एकदा किंमत, परफॉर्मन्स या दमदार पॉइंट्समुळे या छोट्या त्रुटी बाजूला राहताना दिसतात.

Trending