आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने सुपरफास्ट 5-जी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही सेवा घेणार्‍या युजरला अवघ्या एका सेकंदात संपूर्ण चित्रपट डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.

केवळ एका सेकंदात एक गिगाबाइट एवढी साठवणूक करण्याची क्षमता त्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन किलोमीटर अंतरावरून सेकंदभरात संपूर्ण चित्रपट डाऊनलोड करणे शक्य होणार असल्याचा दावा सोमवारी सॅमसंग कंपनीकडून करण्यात आला. या अतिवेगवान तंत्रज्ञानाला प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी आणखी सात वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2020 मध्ये 5 जी तंत्रज्ञान ग्राहकांच्या हाती येऊ शकेल. 4 जीच्या तुलनेत हे तंत्रज्ञान शेकडो पटीने वेगवान असेल, असा दावा करण्यात आला आहे.