आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG ने लॉन्च केला वॉटर अॅण्ड डस्‍ट प्रूफ स्मार्टफोन; वाचा \'गॅलेक्‍सी s5\'चे फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
SAMSUNG ने आपला बहुप्रक्षित 'गॅलेक्‍सी S5 म‍िनी' स्मार्टफोन सादर केला आहे. 'गॅलेक्सी S5 मिनी'च्या माध्यमातून टॉप स्‍मार्टफोनमधील लेटेस्ट फीचर्स आता लहान साइजमधील फोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

'गॅलेक्‍सी s5 मिनी'मध्ये फिंगरप्रिंट सेंसर, अल्‍ट्रा पॉवर सेव्हिंग मोड आणि हार्ट रेट मॉनिटर असे एक्सक्लुसिव्ह फीचर्स देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा फोन IP67 सर्टिफाइड आहे. अर्थात तो वॉटर आणि डस्‍ट प्रूफ आहे. मायक्रो युएसबीसारखे खास वैशिष्ट्ये देण्यात आले आहे.

रशियात लॉन्‍च होईल गॅलेक्सी S5 मिनी...
SAMSUNG ने दिलेल्या माहितीनुसार, ग्‍लोबल रिलिजनंतर येत्या काही महिन्यात रशियात हा लॉन्‍च केला जाणार आहे. या फोनच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. चारकोल ब्‍लॅक, शिमरी व्हाइट, इलेक्ट्रीक ब्‍लू आणि कॉपर गोल्‍ड कलर मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. अन्‍य फीचर्समध्ये एसीलेरोमीटर, डिजिटल कम्‍पास, गायरो, प्रॉक्जिमिटी, ए-जीपीएस, आयआर रिमोट आणि अँबिएंट लाइट सेंसर यांचा समावेश आहे.

फीचर्स....

स्‍क्रीन: 4.5 इंचाचा 720p एचडी स्‍क्रीन
कॅमेरा: 8 एमपीचा रिअर कॅमेरा तर 2.1 एमपीचा फ्रंट कॅमेरा विथ एलईडी
प्रोसेसर: 1.4 गीगाहर्ट्ज क्‍वाड कोर
रॅम: 1.5 जीबी
इंटरनल मेमरी: 16 जीबी (64 जीबी पर्यंत वाढवता येते.)
बॅटरी: 2100 एमएच
कनेक्‍ट‍िव्हिटी : 2G, 3G, 4G, वाय-फाय, ब्‍लूटूथ 4.0
सॉफ्टवेअर: अँड्रॉइड किटकॅट 4.4
(फाइल फोटो)

पुढील स्‍लाइडवर वाचा, एस5 आणि एस5 मिनीमधील फरक...