आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगवर मायक्रोमॅक्स वरचढ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - देशातील सर्वात लहान पण झपाट्याने विस्तारणार्‍या मोबाइल कंपन्या, महागडे स्मार्टफोन तयार करणार्‍या मोठय़ा आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना आव्हान देत आहेत. जेमतेम बजेटवाले लोक स्थानिक कंपन्यांच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. या स्वस्त फोनमध्ये महागड्या स्मार्टफोनसारखेच फीचर्स आहेत.

भारतात मायक्रोमॅक्स आणि कार्बनचे ‘लो एंड हँडसेट्स’ खूप लोकप्रिय होत आहेत. तर सॅमसंग, नोकिया आणि सोनीचे मार्केट शेअर सध्या नाजूक परिस्थितीचा सामना करत आहेत. चीनमध्ये कूलपॅड आणि गियोनीचे मार्केटही असेच वेगाने वाढत आहे. चीनमधील मोबाइल बाजारपेठेत या कंपन्यांची 40 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. म्हणजेच जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांत आंतरराष्ट्रीय मोबाइल ब्रँड्सची भागीदारी मागील वर्षीच्या तुलनेत कमी तर झाली; पण त्याबरोबरच स्थानिक ब्रँड्स जवळपास त्यांच्याएवढीच भागीदारी मिळवण्यात यशस्वी झाले. ‘आंतरराष्ट्रीय डाटा कॉर्पोरेशन’ (आयडीसी) च्या अहवालात ही माहिती दिली आहे. आशियातील सर्वेक्षणावर आधारित या अहवालानुसार, मोबाइल व्हेंडर्सनी या वर्षातील दुसर्‍या तिमाहीत 119 दशलक्ष हँडसेट्सची विक्री केली. 2012 च्या तुलनेत हा आकडा 75 टक्क्यांनी जास्त आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सॅमसंगची भारतीय बाजारातील भागीदारी 32.7 टक्के होती. ती तिसर्‍या तिमाहीत घसरून 26 टक्क्यांवर आली. तरीही बाजारातील भागीदारीत ती कंपनी अव्वल आहे. सॅमसंगची ‘कॅश बॅक’ व ‘झीरो पर्सेंट ईएमआय’ ऑफर ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली.