आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samvat 2070 Off To Flying Start; Sensex, Nifty End At New Highs

शेअर बाजाराच्या सेन्सेक्सची लक्ष्मीपूजन मुहूर्तावर विक्रमी झेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेअर बाजारात रविवारी मुहूर्ताच्या खरेदीकाळात लक्ष्मी प्रसन्न झाली. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सायंकाळी 75 मिनिटांच्या व्यवहारांत निर्देशांकाने 124.72 अंकांची उसळी घेत 21,321.53 अंकांची विक्रमी पातळी गाठली. 21,239.36 अशा विक्रमी पातळीवरच तो बंद झाला. दिल्ली शेअर बाजारातही हाच कल होता. गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे निफ्टी 6,317.35 अशा विक्रमी पातळीवर बंद झाला.

गेल्या चार सत्रांमध्ये सेन्सेक्सने 626.53 अंकांची कमाई केली आहे. रविवारी मुहूर्ताच्या व्यवहारांत आरोग्य सेवा, ऑटोमोबाइल, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणार्‍या कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाली. 30 ब्लू चिप कंपन्यांपैकी 22 कंपन्यांच्या शेअर्सचा भाव यामुळे वधारला.

प्रारंभी निर्देशांकाच्या उसळीनंतर विक्रीमुळे काहीशी मंदावली. निर्देशांक वधारताच काही गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करून दिवाळी साजरी केली. यामुळे सुरुवातीला 21,321 अंकांपर्यंत पोहोचलेला निर्देशांक 21,239 च्या पातळीवर बंद झाला.

सायंकाळी 6.15 वाजता शेअर बाजार उघडला. अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या हस्ते मुहूर्तावर व्यवहार सुरू करण्यात आला. या वेळी अभिनेते सुरेश ओबेरॉय आणि बीएसईचे अध्यक्ष एस. रामादोरई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सेन्सेक्सने गेल्या शुक्रवारीच दिवाळी साजरी केली होती. सकाळी व्यवहार सुरू झाल्यानंतर जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने 21,200 अंकांचा पल्ला ओलांडला होता. दिल्ली शेअर बाजारातही ‘निफ्टी’ची धमाल होती. निफ्टीच्या निर्देशांकाने उसळी घेऊन 6307.20 अंकांची पातळी गाठली होती.