आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sandip Kale Article About Marathi Man And Share Market, Divya Marathi

मराठी पाऊले चालती शेअर बाजाराची वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्य गुंतवणूकदारांची पावले शेअर बाजाराकडे वळावीत यासाठी सरकारी पातळीवर राबवल्या गेलेल्या उपाययोजनांचा मोठा हातभार गुंतवणूकदारांची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरला. तोटा झाला तर जाऊ दे, भलती ‘रिस्क’ नको, अशीही एक मराठी मानसिकता होती; पण गेल्या सहाएक वर्षांत ही मानसिकता बदलली असून मराठी माणूस अधिकाधिक संख्येने शेअर बाजाराची वाटचाल करीत आहे.
निव्वळ जुगार किंवा सट्टाबाजार अशा गैरसमजातून आतापर्यंत शेअर बाजाराकडे बघितले जात होते. पण तरीही अनेक कंपन्यांच्या समभागांची दररोज लाखो-करोडो रुपयांची होत असलेली उलाढाल आणि गुंतवणूकदारांची वाढत असलेली र्शीमंती बघितल्यानंतर दलाल स्ट्रीटबद्दल जाणून घेण्याबद्दल नकळत मनात उत्सुकता आल्याशिवाय राहत नाही. पण नको, उगाच तोटा झाला तर जाऊ दे, भलती ‘रिस्क’ नको अशीही एक मराठी मानसिकता होती; पण गेल्या सहाएक वर्षांत ही मानसिकता बदली असून मराठी माणूस अधिकाधिक संख्येने शेअर बाजाराची वाटचाल करीत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरी संगणक आल्याने आपल्या गावातल्या ब्रोकरच्या कार्यालयात जाण्याची गरजच उरली नाही. कारण ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग प्रणालीमध्ये एकदा डिमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडले की घरबसल्या हे व्यवहार करणे शक्य झाले. पूर्वी ब्रोकर म्हटला की मराठी माणूस एकदम सावध व्हायचा पण आता परिस्थिती बदलली आहे.

सामान्य गुंतवणूकदारांची पावले शेअर बाजाराकडे वळावीत यासाठी सरकारी पातळीवर राबवल्या गेलेल्या उपाययोजनांचा मोठा हातभार गुंतवणूकदारांची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरला हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रंथ संचालनालयाने तर आर्थिक साक्षरता आणि शेअर बाजारावरील मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता छोट्या छोट्या गावांमधील महाविद्यालये आणि वाचनालयाच्या सहकार्यातून मेळावे भरवले जातात. विशेष गोष्ट म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागांमधील नवीन गुंतवणूकदारांमध्ये शेअर बाजाराबद्दलची सजगता जास्त वाढू लागली आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

शेअर बाजारात र्शीमंत कसे व्हाल याचे विनामूल्य धडे अनेक संस्था देत असल्याने त्याचीही भर यात पडली आहे. मुंबईतल्या परळ येथील तरुण ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग करणार्‍या पौर्णिमा शिरिसकर म्हणतात की, लांब कशाला, अगदी अजूनही बाजाराबद्दलची जुगाराची मानसिकता थोड्याफार फरकाने आहे. पण हा सट्टा-बाजार काय हे जाणून घेतले तर खरेदी - विक्री जास्त प्रमाणात होणे. मॉल, वाण्याकडेही खरेदी- विक्री होते, मग तो सट्टा -बाजार नाही का. शेअर बाजार असो वा अन्य कोणता , मराठी माणसाने ज्ञान मिळवले तर त्याला तो जमणार नाही का, नेमका हाच विचार करून मी या व्यवसायात उतरले.
आर्थिक साक्षरता
महाराष्ट्राच्या ग्रंथ संचालनालयाने तर आर्थिक साक्षरता आणि शेअर बाजारावरील मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता छोट्या छोट्या गावांमधील महाविद्यालये आणि वाचनालयाच्या सहकार्यातून मेळावे भरवले जातात.