आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satya Nadella Become The CEO Of Microsoft Company

सत्या नाडेलांची सॅलरी 47.5 कोटी; दिग्गजांना मागे टाकून बनले \'माइक्रोसॉफ्ट\'चे CEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानात संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणारी सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मंगळवारी नियुक्ती झाली. बदलत्या प्रवाहात सत्या नाडेला यांच्याशिवाय सीईओपदासाठी दुसरा कोणी असूच शकत नसल्याचे मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी म्हटले आहे. सत्या नाडेला यांचे त्यांना अभिनंदनही केले आहे.

सत्या यांच्यात उत्तम इंजिनिअरिंग स्किल्स असून नेतृत्त्वगुणही आहे. सत्या यांच्याकडे बिझनेस व्हिजन असून आपल्या सहकार्‍यासोबत कशापद्धतीने काम करायचे हे सत्या यांना चांगलेच ठाऊक आहे. मायक्रोसॉफ्टला हवा असलेला सीईओ सत्या नाडेला यांच्या रुपाने मिळाला असल्याचेही बिल गेट्‍स यांनी सांगितले.

1967 मध्ये आंध्र प्रदेशातील कृष्णानगर जिल्ह्यात जन्मलेले सत्या नारायण नाडेला हे वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षीच मायक्रोसॉफ्ट कंपनीत रूजू झाले होते. गेल्या 22 वर्षांपासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत असलेले सत्या तिसरे CEO आहेत. विशेष म्हणजे त्यांचाचे वार्षिक वेतन 47.5 कोटी रुपये आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदासाठी पाच जण झाले होते शॉर्टलिस्ट...