आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर खरेदी वा इन्शुरन्स म्हणजे बचत नव्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोनिकाचे नुकतेच लग्न झाले आहे. दररोज वाढणा-या खर्चामुळे ती त्रस्त आहे. तिला वाटते की, दररोजच नवीन खर्च होत आहे. त्यात कुठे येण्या-जाण्याचा खर्च, भेटवस्तूंचे बिल, मित्रांसोबत मनोरंजनाचा खर्च, गृहसजावट, भांडी-कपडे आणि आवश्यक गोष्टींचा खर्च आहे. परिणामी तिच्याकडे बचतीसाठी काहीच शिल्लक उरले नाही.

आधी ती तिच्या पगारात खुश होती. काही पैशांची बचत करत होती, पण आता असे काहीच होत नाही. हा प्रकार फक्त मोनिकाच्या बाबतीतच घडत आहे, असे नाही. ब-याचदा आपण शॉपिंगच्या नादात सगळी बचत संपवून टाकतो.

बचतीविषयी विचार करण्यापूर्वी पगार संपवण्याची तयारी झालेली असते. त्यामुळे आपण काहीच बचत करू शकत नाहीत. योग्य वेळी बचत करण्यासाठी खर्चापूर्वीच बचतीचे पैसे वेगळे काढून ठेवावे. त्यामुळे आपल्याला किती खर्च करायचा आहे, हे समजेल. हा सोपा उपाय आहे. पैसा खर्च केल्यानंतर बचत करणे कठीण जाते.

बचत करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पगारातून पीएफ कपात करा. बचतीचा हा सोपा मार्ग आहे. पगार हातात येण्यापूर्वी काही भाग बचत केला जातो, हे अनेकांना माहीत नसते. तसेच सिप (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) घेऊ शकता. पगार मिळताच बचत करू शकतो. म्युचुअल फंड किंवा पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डायरेक्ट डेबिट प्लॅन करू शकतो. हे पैसे आपोआपच खात्यातून कपात होतात. त्यामुळे पैसे डिपॉझिट करण्याचे टेन्शन नसते. कोणत्याही कष्टाशिवाय नियमित पैशांची बचत होते. तुम्ही बोनसचे 50 टक्के आणि एक वेळचा इनसेंटिव्ह बचत करू शकता. हळूहळू पैसे जमा होतील, त्यातून तुम्ही एखादी मोठी, नवी वस्तू घेऊ शकता. सॅलरी वाढल्यास बचतही सतत वाढवू शकता. सिपचा प्लॅनही असाच ठेवा. पगार वाढल्यास सिपमध्ये बचत होणा-या रकमेत वाढ करा.

आपल्यापैकी अनेकजण बचतीची प्लॅनिंग करताना घाई करतात. घर खरेदी करणे किंवा विमा काढणे ही बचत नव्हे. तुम्ही विचार करून खरेदी केले असेल, ईएमआय कमी असेल तर घर खरेदी ही चांगली कल्पना ठरू शकते. इन्शुरन्स करताना इन्शुरन्स कव्हर जास्त आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आकर्षक असायला हवे. इन्शुरन्सचा प्रीमियम जास्त ठेवल्यास पैशांची चणचण भासेल.

तुम्ही जास्त बचत करू शकत नसाल तर थोड्या प्रमाणात तरी बचत कराच. बचतीची सवय लावून घ्या. तुम्हालाच याचा फायदा होईल.
उमा शशिकांत, एमडी, सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग, मुंबई.
uma.shashikant@ dainikbhaskargroup.com