आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेची मोफत अपघात विमा योजना एक जुलैपासून बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेली स्टेट बॅँक ऑफ इंडिया आपल्या गृह तसेच मोटार कर्जदारांना मोफत अपघात विमा सुरक्षा कवच देत आहे, परंतु यंदाच्या जुलैपासून ही मोफत सुविधा बंद करण्याचा निर्णय बॅँकेने घेतला आहे, परंतु ही सुविधा रद्द करण्याचे कारण बॅँकेने स्पष्ट केलेले नाही.

बॅँकेचा सध्याच्या या मास्टर पॉलिसीची मुदत एक जुलै 2013 मध्ये संपत आहे. त्यामुळे गृह आणि मोटार कर्जदारांना देण्यात येणारे वैयक्तिक अपघात विमा सुरक्षा सुविधा एक जुलैपासून बंद करण्यात येत असल्याचे स्टेट बॅँकेने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

एक जुलै 2013 रोजी किंवा त्या अगोदर गृह आणि मोटार कर्जदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास कर्ज खात्यातील दाव्याची रक्कम ही मास्टर योजनेत उल्लेख केलेल्या अटी आणि शर्तीनुसार असेल, असे स्टेट बॅँकेने म्हटले आहे. आपल्या कर्ज जबाबदार्‍यांवर कोणत्याही प्रकारचे विमा सुरक्षा कवच नसलेल्या गृह आणि मोटार कर्जदारांनी स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या विमा कंपनीकडून दिलेल्या पॉलिसीचा पर्याय स्वीकारावा, असे बॅँकेने म्हटले आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या सहकार्यातून 7 लाख खातेदारांना वैयक्तिक अपघात विम्याची सुरक्षा बॅँकेने गेल्या वषी सुरुवात केली.

100 रुपये प्रीमियम, 4 लाखांपर्यंत संरक्षण
स्टेट बॅँक ऑफ इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील आघाडीची विमा कंपनी इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्यातून स्थापन करण्यात आलेली एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी सध्या बॅँकेच्या बचत खातेदारांना वार्षिक 100 रुपयांच्या प्रीमियमवर 4 लाख रुपयांपर्यंतच्या अपघात विम्याचा लाभ देत आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या सहकार्यातून आपल्या देशभरातील 7 लाख खातेदारांना वैयक्तिक अपघात विम्याची सुरक्षा देण्यास स्टेट बॅँकेने गेल्या वर्षीपासून सुरुवात केली आहे.