आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SBI Cuts Interest Rate On Home Loans, Lighten EMI Burden

गृहकर्जावरील व्याज दरात SBI ने केली कपात; EMI चे ओझे हलके होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) त्यांच्या गृहकर्जाच्या दरांमध्ये बदल केले आहेत. एसबीआयने 0.05 पासून 0.15 टक्क्यांपर्यंत व्याजदर कमी केले आहेत. एसबीआयचे नवीन दर 26 ऑगस्टपासून लागू होतील. 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 10.10 टक्के दर, तर 75 लाखांपेक्षा जास्तच्या गृहकर्जासाठी 10.15 टक्के व्याजदर लावण्यात आले आहे. हे नवे दर सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी एकसारखे लागू होणार आहेत. एसबीआयच्या या निर्णयाने घर विकत घेण्याची तयारी करत असलेल्या लोकांना थोडा दिलासा मिळू शकतो.
या बँकांनीही कमी केलेत दर
'आयसीआयसीआय' बँकेने पाच कोटी रुपयांपर्यंत 10.15 टक्के फ्लोटिंग दराने गृहकर्ज देत आहे. तर 'एचडीएफसी'ने नवीन ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजाचे दर कमी करत 10.15 टक्के केले आहेत. हे नवे दर 1 ऑगस्ट 2014 पासून लागू होणार आहेत. ही योजना नोकरदार आणि स्वंयरोजगारीत अशा दोन्ही ग्राहकांसाठी आहे. येणार्‍या काही दिवसांत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातसुध्दा बँका गृह कर्जावरील व्याजदर कमी करणार आहेत.
बांधकाम क्षेत्रावर प्रभाव
बँकांकडून गृहकर्जावरील व्याज दर कमी केल्याने बांधकाम क्षेत्र वेग घेऊ शकतो. याबद्दल अंतरिक्ष ग्रूपचे संचालक राकेश यादव म्हणाले की, "हे एक चांगले पाऊल आहे. यामुळे घर घेणार्‍यांना फायदा होईल आणि ईएमआयचे ओझे सुध्दा थोडे हलके होईल. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याने मागणी वाढेल आणि फ्लॅटच्या विक्रीमध्ये वाढ होईल."