आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईपीएफओ फंडावर एसबीआयने दिला सर्वाधिक परतावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कमर्चारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) फंड व्यवस्थापनात चांगला परतावा देत स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) अव्वल स्थान पटकावले आहे. कमर्चा-यांच्या भविष्य निर्वाह निधीवर चांगला परतावा देण्याच्या बाबतीत एसबीआयने एचएसबीसी, रिलायन्स कॅपिटल आणि आयसीआयसीआय सेक्युरिटीज या फंड व्यवस्थापकांना मागे टाकले आहे. क्रिसिल या रेटिंग एजन्सीने केलेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.
1 नोव्हेंबर 2011 ते 31 मार्च 2012 या पाच महिन्यांच्या कालावधीत स्टेट बँकेने ईपीएफओवर 9.31 टक्के परतावा दिला. ईपीएफओसाठी निश्चित करण्यात आलेल्या 9.24 टक्के या बेंचमार्क रिटनर्पेक्षा हा एसबीआयचा परतावा अधिक आहे. ईपीएफओच्या निधीचे व्यवस्थापन करणा-या खासगी क्षेत्रातील एचएसबीसी असेट मॅनेजमेंट कंपनी, रिलायन्स कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी आणि आयसीआयसीआय सेक्युरिटीज प्रायमरी डीलरशिप लिमिटेड या इतर कंपन्यांनी बेंचमार्क 9.24 टक्क्यांपेक्षा कमी परतावा दिल्याचे क्रिसिलने म्हटले आहे. या व्यवस्थापन कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी ईपीएफओने क्रिसिलची नियुक्ती केली आहे.
ईपीएफओचे 5 कोटींहून अधिक कमर्चारी ग्राहक आहेत आणि त्यांच्याकडे 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आहे. या निधीचे योग्य व्यवस्थापन करून त्यावर चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टीने ईपीएफओने चार फंड व्यवस्थापकांची नियुक्ती केली आहे. या चार कंपन्या ईपीएफओच्या वतीने विविध क्षेत्रांत गुंतवणूक करतात. निर्धारित काळात एचएसबीसी एएमसीने 9.23 टक्के, रिलायन्स कॅपिटल एएमसीने 9.22 टक्के, तर आयसीआयसीआय सेक्युरिटीज 9.20 टक्के परतावा दिला आहे.
क्रिसिलच्या अहवालानुसार, 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2011 या काळात अनिल अंबानी समूहांच्या रिलायन्स कॅपिटल एएमसी कंपनीची कामगिरी सर्वात खराब झाली. या दोन महिन्यांत कंपनीने ईपीएफओसाठी केवळ 9.09 टक्के परतावा दिला. याच काळात एचएसबीसीने सर्वाधिक 9.58 टक्के रिटर्न दिले. एसबीआयने 9.34 टक्के तर आयसीआयसीआय सेक्युरिटीज 9.14 टक्के परतावा दिला.
अहवालानुसार जानेवारी- मार्च तिमाहीत एसबीआयने सर्वाधिक 9.22 टक्के परतावा दिला. त्याशिवाय रिलायन्स कॅपिटलने 9.16 टक्के, आयसीआयसीआय सेक्युरिटीज 9.10 टक्के आणि एचएसबीसी एएमसीने 8.98 टक्के परतावा दिला आहे.