आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयचे गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतातील सर्वांत मोठय़ा स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. बँकेचे चेअरमन प्रतीप चौधरी यांनी एका कार्यक्रमात दरकपातीचे संकेत दिले. दुसरीकडे एसबीआयमधील गुंतवणूक वाढवण्याची सरकारची तयारी आहे.

चौधरी म्हणाले की, दीर्घ कालावधीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरातही कपात करण्यात येऊ शकते. मात्र, लघु मुदतीच्या एफडीवरील व्याज आहे तेच राहील. बेस रेट कमी करण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. फ्लोटिंग होम लोन शिफ्ट करण्याचे शुल्क 1 टक्क्यावरून अध्र्या टक्क्यावर आणण्याचा विचार केला जाऊ शकतो. प्रतिस्पर्धेमुळेच डिपॉझिटवरील व्याजदर निश्चित होतात. शैक्षणिक कर्जाची जबाबदारी घेण्यासाठी सरकारने पुढे पाऊल टाकावे, अशी अपेक्षाही चौधरी यांनी व्यक्त केली. वाढत्या एनपीएमुळे एसबीआय अधिक चिंताग्रस्त नसल्याचे त्यांनी सांगितले.