आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयची मॉल बँकिंग, एटीएम वापरण्याइतके सोपे असेल खाते उघडणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः भारतीय स्टेट बँकेने आपल्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून टेक सॅव्ही ग्राहकांसाठी एक आकर्षक भेट दिली आहे. बँकेने देशातील पाच शहारांमध्ये डिजिटल टच बँकेची सुरूवात केली आहे. यातील एक शाखा दिल्लीमध्ये सुरू झाली असून तिचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय अशा अजून पाच शाखा मुंबई, बंगळूरू, चेन्नई आणि अहमदाबाद येथे सुरू करण्यात येणार आहे.
एसबीआयचे एसबीआय इन टच
एसबीआयने देशातील युवकांच्या वाढती संख्या व त्यांच्या गरजा लक्षात घेऊन 'एसबीआय इन टच' नावाने शाखा उघडली आहे. आजचे युवक सोशल नेवटवर्कींग आणि मॉल्समधील शॉपिंग जास्त पसंद करतात. त्यामुळे एसबीआयने हे बँक मॉल्सच्या आत सुरू केले आहेत.
टच करा आणि खाते खोला...
एसबीआय इन टच अशा नावाने सुरू करण्यात आलेल्या या शाखेत डिजिटल बँकींगची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे सेल्फ सर्व्हीस बँकींगला प्राधान्य मिळेल. ग्राहक या शाखांमध्ये जाऊन त्वरीत आपले सेव्हिंग अकाऊंट उघडू शकतील. त्याशिवाय येथे पर्सनलाइज्ड डेबीट कार्डही दिले जातील.
तसेच शैक्षणिक, कार, गृह कर्ज देखील येथे त्वरीत मंजूर केले जातील. एवढेच नव्हे तर व्हिडीओ लिंकच्या साह्याने ग्राहक तज्ज्ञांशीही संपर्क साधू शकतील. हे तज्ज्ञ ग्राहकांच्या सर्व अडचणींचे क्षणात निराकरण करून देतील. त्यासाठी या शाखेत विशेष सुविधा करून देण्यात आली आहे.

कुठे कुठे उघडल्या आहेत या शाखा...
जाणून घ्या पुढील लिंकवर....