तुमचे घर एखाद्या शहर किंवा गावातील बाजारात अथवा वर्दळीच्या ठिकाणी आहे का? तुमच्याकडे 10x10 एवढी जागा आहे, मात्र तुम्ही तीचा सध्या वापर करत नाही आहात अशी जागा आहे का? जर असे असेल तर तुमच्यासाठी घरबसल्या पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय स्टेट बॅंक या वर्षात 5000 नवे एटीएम सुरू करणार आहे. लोकांना एटीएम बाहेरील लांबचलांब रांगेपासून सोडवण्यासाठी तसेच दुसर्या एटीएममधून पैसे काढण्याने अतिरिक्त भाडे देण्यापासून वाचवण्यासाठी एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. एसबीआयच्या या योजनेमुळे त्यांच्या ग्राहकांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. तसेच तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊन चांगलीच कमाई करू शकता.
जाणून घ्या, कसा होईल नफा
जर वरील सर्व गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्ही एसबीआय एटीएमकरिता अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या घराजवळील एसबीआय शाखेत जावे लागेल आणि त्यांना नवीन एटीएम सुरू करायचे आहे का याबद्दल माहिती मिळवावी लागेल. जर बँकेला एटीएम उघडायचे असेल तर तुम्ही एटीएमसाठी अर्ज दाखल करू शकता.
केवढी जागा हवी आणि किती मिळेल भाडे, जाणून घ्या पुढील स्लाईडवर....