आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो दर, सीआरआरमध्ये कपात हवी : एसबीआय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गुंतवणुकीला चालना देतानाच आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने प्रमुख व्याजदराबरोबरच रोख राखीव प्रमाण कमी करावे, अशी अपेक्षा स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी व्यक्त केली आहे.रिझर्व्ह बँकेचे पतधोरण 29 जानेवारीला जाहीर होत असून त्यामध्ये रोख राखीव प्रमाण (सीआरआर) एक टक्क्याने तसेच रेपोदरात अर्ध्या टक्क्याने कपात करावी, अशी विनंती अगोदरच मध्यवर्ती बॅँकेला करण्यात आली असल्याचे चौधरी म्हणाले.

या अगोदर सीआरआरमध्ये कपात करून ते 6 टक्क्यांवरून 4.25 टक्क्यांवर आणून रिझर्व्ह बॅँकेने दिलासा दिला आहे, पण सध्याचे देशातील महागाईचे चढे प्रमाण लक्षात घेऊन गोठणबिंदूता टाळण्यासाठी व्याजदर देखील कमी करणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधतानाच चौधरी यांनी उत्पादन क्षेत्राला गतिमान करून तसेच पुरवठ्याचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे.
व्याजाचा अडसर
व्याजदर कमी झाल्यास सध्या गुंतवणुकीला चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिकतेला बळकटी मिळेल, परंतु स्थिती अशीच राहिली तर युरोपसारख्या समस्यांचा सामना भारतालाही करावा लागेल, अशी भीती चौधरी यांनी व्यक्त केली.