आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयच्या खातेदारांना मिळणार अपघात संरक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देशभरातील 7 दशलक्षांहून अधिक खातेधारकांना व्यक्तिगत अपघात विमा संरक्षण देणार आहे. यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्सची मदत घेण्यात येणार असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

एसबीआयचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी सोमवारी सांगितले की, खातेदारांना अपघात विमा संरक्षण देण्याचा निर्णय झाला असून त्याअंतर्गत अपघातग्रस्त खातेदाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे. मार्च 2013 पर्यंत 10 दशलक्ष खातेदारांना ही सुविधा देण्याचा एसबीआयचा विचार आहे. अपघातात खातेदाराचा दुर्दैवाने मुत्यू झाल्यास चार लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. खातेधारांना यासाठी एक साधा अर्ज भरून द्यावा लागणार असून 100 रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत. एसबीआयच्या खातेदारांसाठी ही चांगली सुविधा असल्याचे मत एसबीआय जनरल इन्शुरन्सचे एमडी व सीईओ भास्कर सारमा यांनी सांगितले. एसबीआयच्या 14,000 शाखांतील खातेदारांना याचा लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले.