आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SBI's Loan Become Cheap: Dasara, Diwali Special Offer

एसबीआयचे कर्ज स्वस्त; दसरा, दिवाळीसाठी विशेष ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदाती बँक स्टेट बँक ऑ फ इंडियाने (एसबीआय) सणांच्या हंगामातील मागणी पूर्ण करण्यासाठी कर्जाचे व्याजदर कमी केले असून प्रक्रिया शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि आयडीबीआयपाठोपाठ कर्ज स्वस्त करणारी एसबीआय चौथी बँक ठरली आहे. सणाच्या हंगामातील मागणी पूर्ण करण्यासाठी बँकांनी कर्ज स्वस्त करावे, असे निर्देश रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयाने आठवड्यापूर्वी दिले होते. त्याला आतापर्यंत या चार बँकांनी प्रतिसाद दिला आहे.


एसबीआयने कार खरेदी आणि टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू (कन्झ्युमर ड्युरेबल्स) वस्तू खरेदीसाठीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली. एसबीआयने यासाठी ‘उत्सव के रंग, एसबीआय के संग’ अशी विशेष योजना सादर केली आहे. कारसाठीच्या कर्जावरील व्याजदरात एसबीआयने 0.20 टक्के कपात केली. आता कारसाठीच्या कर्जाचे व्याजदर 10.75 टक्क्यांवरून 10.55 टक्के झाले आहेत. कर्जाच्या रकमेवरील प्रक्रिया शुल्कात 0.50 टक्के कपात केली आहे. आता किमान प्रक्रिया शुल्क 1020 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आले आहे. एसबीआयची सणासाठीची ही विशेष ऑ फर सात ऑ क्टोबर ते 31 जानेवारी 2014 पर्यंत सुरू राहणार आहे. या ऑ फरअंतर्गत ग्राहकांना कार, मोटारसायकल, टीव्ही, फ्रिज, एसी आदींच्या खरेदीसाठी सवलतीच्या दरात कर्ज मिळणार असल्याचे एसबीआयने स्पष्ट केले.


इंडियन ओव्हरसिज, देना बँकेचे कर्ज स्वस्त

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसिज बँकेने कन्झ्युमर ड्युरेबल्सच्या कर्जाचे व्याजदर दोन टक्क्यांनी कमी केले आहेत. या कर्जावर आता 15.25 ऐवजी 13.25 टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. नवे दर तत्काळ लागू झाले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील देना बँकेनेही गृह, कार व कन्झ्युमर ड्युरेबल्सच्या कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.


अशी आहे योजना
० कारसाठीच्या कर्जावरील व्याजदरात 0.20 टक्के कपात.
० कर्जाच्या रकमेवरील प्रक्रिया शुल्कात 0.50 टक्के कपात
० कर्जाच्या रकमेवर आता किमान 500 रुपये शुल्क
० सात ऑ क्टोबर ते 31 जानेवारी 2014 पर्यंत ऑ फर सुरू
० कार, मोटारसायकल, टीव्ही, फ्रिज, एसी आदींच्या खरेदीसाठी मिळणार कर्ज