आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Android App च्या साह्याने शोधा मतदार.यादीतील नाव; मराठी तरूणाचा कारनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: विधानसभा निवडणूक अवघ्या एक दिवसांवर आल्या आहेत. प्रत्येक स्तरातून निवडणूकीची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक जाहिराती, फलके, रेडीओ तसेच सोशल नेटवर्कींगवरही मदतान करा या आशयाच्या अनेक पोस्ट, जाहिराती झळकत आहेत. यामध्येच अजून एक पाऊल पुढे टाकत नाशिकच्या श्रीकांत निंबाळकर या तरूणाने निवडणूकीसाठी एक खास अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्या मदतारांना हे अ‍ॅप जास्त फायद्याचे ठरेल.
तसेच या अ‍ॅपमध्ये निवडणूकीदरम्यानच्या सर्व पक्षांच्या बातम्या, तसेच निवडणूकीदरम्यानचे व्हिडीओ देण्यात आले आहेत. त्याच बरोबर निवडणूकी दरम्यानचे काही प्रश्न, निवडणूकीला जाताना काय न्यावे यासंबंधीचे मार्गदर्शनही या अ‍ॅपमधून करण्यात आले आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, कशा पध्दतीने नाव सर्च करायचे या अ‍ॅपमधून तसेच शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडीओ...