आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sebi Can Take Asset Of Sahara Company : Supreme Court

सहारा कंपन्यांची संपत्ती सेबी जप्त करू शकते : सर्वोच्च न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सहारा समूहातील दोन कंपन्या न्यायालयाचे आदेश मानत नसून सेबी त्यांची संपत्ती जप्त करू शकते, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सहाराला सुनावले. सेबीला या कंपन्याची खाती गोठवण्याची मुभा असल्याचे कोर्टाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑ गस्ट 2011 रोजी दिलेल्या आदेशानुसार सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांची संपत्ती जप्त करण्याचे तसेच त्यांची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी अद्याप ठोस पावले न उचलल्याबद्दल कोर्टाने सेबीलाही झापले. न्या. के.एस. राधाकृष्णन आणि न्या. जे.एस. केहर यांच्या खंडपीठाने सेबीवर ताशेरे ओढले. खंडपीठाने विचारले, तुम्ही काय पावले उचलली, आदेशात नेमके काय करावे हे सांगितले आहे. तरीही तुम्ही पावले का टाकत नाहीत. यावर सेबीने कारवाई सुरू असून त्या कंपन्यांना नोटीस बजावल्याचे सांगितले. यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली व केवळ आदेश देऊन भागत नसल्याचे सुनावले. खंडपीठाने या कंपन्यांना अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली असून उत्तरासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.