आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • SEBI Chief For Better Branding Of Mutual Fund Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरकोळ गुंतवणूकदारांना लावणार फंडांचा लळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता गेल्या महिन्यात प्रथमच 10 ट्रिलियन रुपयांच्या वर गेली आहे. त्यामुळे आता म्युच्युअल फंड क्षेत्रात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने जास्त पावले उचलली जात असल्याचे या उद्योगाची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अ‍ॅम्फी) म्हटले आहे.

अलीकडच्या काही महिन्यांमध्ये समभाग योजनांध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. विशेष म्हणजे द्वितीय आणि तृतीय शहरांमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग जास्त असल्याने अशा गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ‘अ‍ॅम्फि’चे अध्यक्ष सुदीप सिक्का यांनी ‘सीआयआय’ने आयोजत केलेल्या परिषदेत सांगितले. ‘एसआयपी’ नियोजनबद्ध गुंतवणूक योजनांचा पर्याय गुंतवणूकदार अधिकाधिक स्वीकारू लागले असल्याने भांडवल बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला असल्याकडे सिक्का यांनी लक्ष वेधले.

‘एसआयपी’कडे ओढा
० म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता एप्रिलमधील 9.45 ट्रिलियनवरून मे महिन्यात 10.11 ट्रिलियनवर गेली आहे.
० अव्वल 15 शहरांच्या पलीकडच्या शहरांतून किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग एक टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे मार्च वगळता नोव्हेंबरपासून या भौगोलिक ठिकाणाहून म्युच्युअल फंड उद्योगात निधीचा चांगला ओघ येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
० कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार ब गटातील 15 शहरांमधून जवळपास 7,00,000 एसआयपी खाती आर्थिक वर्ष 2014 मध्ये उघडली असून हे प्रमाण जवळपास 53 टक्के असल्याचे सिक्का यांनी सांगितले.

(डेमो पिक)