आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेबीची न्यू फंड ऑफरला मुदत वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ‘राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम’ या योजनेअंतर्गत नवीन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारांकडून रक्कम घेण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा कालावधी अगोदर 15 दिवसांचा होता, परंतु आता म्युच्युअल फंडांना 30 दिवसांपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत सहभागी करून घेता येणार आहे.


लहान गुंतवणूकदारांना भांडवल बाजाराकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने सरकारने राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम सुरू केली आहे, परंतु या योजनेअंतर्गत देण्यात आलेली मुदतवाढ ही केवळ म्युच्युअल फंडांसाठीच आहे.
साधारणपणे नवीन फंड ऑफरसाठी (एनएफओ) नोंदणी करण्याचा कालावधी हा 15 दिवसांचा असतो, परंतु सेबीच्या 19 जून रोजीच्या एका अध्यादेशामध्ये म्युच्युअल फंडांसाठी हा कालावधी 30 दिवसांपर्यंत वाढवून देण्यात आला आहे.