आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sebi Finds Large scale Violations Of Norms In Some Mutual Funds

म्युच्युअल फंडांच्या काही योजनांत नियमांचा भंग, सेबीची दंडात्मक कारवाईची ताकीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही निवडक म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमांचा भंग झाला असल्याचे बाजार नियंत्रक सेबीच्या नजरेत आले आहे. किमान 20 गुंतवणूकदार आणि कमाल 25 टक्के एकट्या गुंतवणूकदारांच्या व्यवहारांमध्ये नियमभंगाचा प्रकार वारंवार घडला असल्याचे ‘सेबी’ने म्हटले आहे. या नियमभंगाबाबत म्युच्युअल फंड कंपन्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याची ताकीदही देण्यात आली आहे
म्युच्युअल फंड कंपन्यांच्या योजनांच्या तिमाही डिस्क्लोजरचे विश्लेषण केल्यानंतर नियम भंगाचा प्रकार निदर्शनास आला असल्याचे एका म्युच्युअल फंड कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अधिकार्‍यांना याबाबत बाजार नियंत्रकांकडून आदेशही देण्यात आल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांमध्ये नियमांचा वारंवार विशेष करून तिमाही कालावधीत भंग केला जात असल्याचे सेबीला दिसून आले आहे. काही गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात आणि तिमाही अखेरच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी नंतर ती रक्कम काढून घेतात तर अनेक योजनामध्ये संपूर्ण तिमाही आधारावरही नियमांची पूर्तता केली जात नसल्याचे सेबीने म्हटले आहे.