आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sebi Freezes All Bank Accounts Of 2 Sahara Companies

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुब्रतो रॉय यांची कोणकोणती मालमत्ता होणार जप्त; मल्यांच्या व्हिलालाही लागणार टाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील दोन मोठे उद्योगपती अडचणीत येण्याची शक्यता आहे. सहारा समुहातील दोन कंपन्यांची बँक खाती बाजार नियामक सेबीने गोठवली आहेत. तर, किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष विजय मल्या यांच्या किंगफिशर ब्रँड सोबतच गोव्यातील त्यांचा अलिशान व्हिला देखील जप्त होण्याची शक्यता आहे.

सेबीने सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि वरिष्ठ अधिका-यांची बँक खाती गोठविण्याचे सांगितले आहे. तसेच, रॉय यांची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत न केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे.

सहारा समूहाचा दावा
गुंतवणूकदारांना 19,400 कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत, असा सहारा ग्रुपचा दावा आहे. 5,120 कोटी रुपये देण्याचा प्रश्न आहे, तेव्हा यातील 2,620 कोटी रुपयेच गुंतवणूकदारांना द्यायचे आहेत.

पुढच्या स्लाईडमध्ये वाचा, सुब्रतो रॉय यांची कोणती मालमत्ता होणार जप्त.