आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कंपन्या करणार सहा हजार कोटींची फेरखरेदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केर्न इंडिया, डीसीएम श्रीराम यांच्यासह शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या पाच कंपन्यांनी आपल्य भागधारकांकडून यंदाच्या वर्षात जवळपास सहा हजार कोटी रुपयांच्या समभागांची फेरखरेदी (बायबॅक ऑफर) करण्याचा इरादा व्यक्त केला आहे.

खुल्या बाजारातील व्यवहाराच्या माध्यमातून आपापल्या भागधारकांकडून 19 कोटी समभागांची फेरखरेदी करण्यासाठी याच पाच कंपन्यांनी जवळपास 5,940.85 कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याची योजना आखली असल्याचे ‘सेबी’च्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

या पाचही कंपन्या आपली ऑफर खुली झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत आपली फेरखरेदी योजना पूर्ण करतील. आपल्या ऑफरपैकी किमान 50 टक्के समभाग खरेदी करणे सेबीच्या ऑगस्टमध्ये जाहीर झालेल्या नव्या नियमाप्रमाणे बंधनकारक असेल.

यंदाच्या वर्षात आतापर्यंत 14 कंपन्यांनी आपला फेरखरेदी कार्यक्रम पूर्ण केला आहे. या कंपन्यांनी जवळपास आठ कोटी समभागांची 1,210.62 कोटी रुपयांना फेरखरेदी केली आहे. या कंपन्या अशा : क्रॉम्प्टन ग्रीव्हज, अ‍ॅप्टेक, यूपीएल लिमिटेड, जिंदाल स्टील अँड पॉवर, महाराष्ट्र सीमलेस.

समभाग फेरखरेदी योजना राबवणार्‍या पाच कंपन्या
केर्न इंडिया, डीसीएम श्रीराम, गुजरात अपोलो इंडस्ट्रीज, इंडो बोरक्स अँड केमिकल्स, एलएसजीईसी हेवी इंजिनिअरिंग.