आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्युच्युअल फंड उद्योगासाठी नवी नियमावली लवकरच, स्वयंनियामक संस्थांसाठी सेबी अनुकूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमारे 19 ट्रिलियन रुपयांची उलाढाल असलेल्या म्युच्युअल फंड उद्योगासाठी स्वयंनियामक संस्थेची अंमलबजावणी करण्याबात भांडवल बाजार नियंत्रक प्रयत्नशील असून वितरक आणि सल्लागारांसाठी लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत ‘सेबी’ने दिले आहेत.
म्युच्युअल फंड क्षेत्रात स्वयंनियामक संघटना असावी, अशी मागणी होती आणि त्याबाबत आपण गंभीर असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा ‘सेबी’चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी ‘सीआयआय’ने आयोजित केलेल्या म्युच्युअल फंड परिषदेत बोलताना व्यक्त केली. वितरक आणि गुंतवणूक सल्लागारांसाठी नवीन नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यात येत असून ती नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वनियंत्रित संघटनेच्या संकल्पनेला न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असले तरी त्याची अंमलबजावणी होण्याचा आशावाद सिन्हा यांनी व्यक्त केला. पेन्शन निधी म्युच्युअल फंड क्षेत्रात येण्याची गरज असल्याचे सांगून सिन्हा म्हणाले की, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमधील गुंतवणूकदारांना कर लाभ देण्याची गरज व्यक्त केली. या दोन्ही नवीन उत्पादनांना देण्यात येणार्‍या कर लाभाबाबत स्पष्टता द्यावी, अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे. कर रचनेसंबंधात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसाठी लवकरच नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.