आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार निवारण यंत्रणा भक्कम करण्यावर भर, सेबीच्या स्टॉक ब्रोकर्सना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुंतवणूकदारांसाठी तक्रार निवारण यंत्रणा आधिक भक्कम करण्याचा निर्णय बाजार नियंत्रक सेबीने घेतला आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या तक्रारी सोडवणे सोपे व्हावे यासाठी स्टॉक ब्रोकर्स आणि बाजारातील मध्यस्थांना आता त्यांच्या सीईओ बरोबरच कार्यालयाचा पूर्ण तपशील द्यावा लागणार असल्याचे सेबीने म्हटले अाहे.

नोंदणीकृत सबब्रोकर्स आणि अधिकृत व्यक्तींसह सर्व स्टॅक ब्रोकर्सची कार्यालये आणि डिपॉझिटरी सहभागीदारांनी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या तक्रार निवारण यंत्रणेची मूलभूत मािहती प्रामुख्याने दर्शनी भागात लावावी, असा निर्णय घेण्यात आल्याचे सेबीच्या एका परिपत्रकात म्हटले आहे. स्टॉक ब्रोकर्स आणि डिपॉझिटरी सहभागीदारांनी त्यांचे सीईओ, भागीदार, मालक यांचे ई-मेल आणि दूरध्वनी क्रमांकासह संपर्काची सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या तक्रार निवारणासाठी योग्य व्यक्तीशी संपर्क साधणे सुलभ होऊ शकेल, असे सेबीने म्हटले आहे.
संपर्काचा तपशील देणे आवश्यक
बीएसई, एनएसई, एमसीएक्स - एसएक्स यांच्या संपर्काचा तपशीलही देणे आवश्यक असेल. एसडीएल आणि सीडीएसएल डिपॉझिटरी यांचाही तपशील देणे गरजेचे असेल. स्टॉक ब्रोकर किंवा डिपॉझिटरी सहभागीदारांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर समाधान न झाल्यास ग्राहकांना वरील ठिकाणी संपर्क साधता येऊ शकेल, असेही सेबीने म्हटले आहे.

>केवळ इतकेच नाही तर त्यांना सेबीच्या टोल फ्री क्रमांकाची माहिती देखील गुंतवणूकदारांना द्यावी लागणार आहे.

> सेबीच्या अध्यादेशातील तरतुदींची पूर्तता करण्यासाठी भांडवल बाजारातील मध्यस्थांना योग्य ती पावले उचलून अध्यादेश निघाल्यापासून ६० दिवसांच्या आ सर्व कार्यालयांना त्याची अंमलबजावणी करावी लागेल.