आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sebi News In Marathi, Anant Barua, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरईआयटीसाठी लवकरच नियमावली, सेबी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार - बारुआ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिअल इस्टेट क्षेत्रात अधिकाधिक प्रमाणात स्थानिक तसेच विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ लवकरच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसाठी (आरईआयटी) नवी नियमावली जाहीर करणार आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात बिझनेस ट्रस्टची निर्मिती आणि नोंदणी करण्याचाही यामागे उद्देश आहे. या संदर्भात विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे सेबीचे कार्यकारी संचालक अनंत बारुआ यांनी ‘असोचेम’च्या परिसंवादात बोलताना सांगितले.

‘आरईआयटी’संदर्भात विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी आणि या विभागांची नोंदणी करणे यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. बाजाराचा सखोल अभ्यास करून जास्तीत जास्त गुंतवणूक रिअ‍ॅल्टी क्षेत्रात आकर्षित करून अर्थव्यवस्थेच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बारुआ यांनी सांगितले.

कार्यालय परिसर, औद्योगिक पार्क, आयटी पार्क, गोदाम, निवासी नव्हे, तर भाडेतत्त्वावरील अपार्टमेंट यासारख्या काही प्रमुख व्यावसायिक मालमत्तांसाठीदेखील आरईआयटी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरईआयटीच्या माध्यमातून रिअ‍ॅल्टी क्षेत्रात आठ ते दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी या ट्रस्टची घोषणा केली होती.