आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sebi To Conduct Investor Campaigns Via Mobile, Internet

बाजाराबाबत गुंतवणूकदार होणार आता ‘स्मार्ट’ साक्षर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजाराबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण करतानाच गुंतवणूकदारांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी बाजार नियंत्रक ‘सिक्युरिटी अ‍ॅँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) विविध उपक्रम राबवत आहे. आता अत्याधुनिक संपर्क यंत्रणांचा वापर करण्याची योजना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून औद्योगिक संस्थांच्या सहकार्यातून इंटरनेट आणि मोबाइलच्या माध्यमातून गुंतवणूक साक्षरता प्रचार मोहीम राबवण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये औद्योगिक संस्था, शेअर बाजार आणि डिपॉझिटरी यांना सहभागी करून गुंतवणूकदारांमध्ये भांडवल बाजाराबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना साक्षर करण्याचा प्रस्ताव सेबीने ठेवला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सेबीने मास मीडियाच्या माध्यमातून ‘गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा’ मोहीम राबवली होती. सेबी नवीन आर्थिक वर्षात मोबाइल आणि इंटरनेटच्या माध्यमांचा वापर करून गुंतवणूकदार साक्षरता मोहीम सुरू करणार आहे.प्रभावी प्रसारासाठी देशातील 13 भाषांतून प्रसाराची योजनाही आखत आहे.