आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sebi Want Reform In Capital Market, U.k.sinha Remarked

सेबीला हव्यात भांडवल बाजारात सुधारणा,यू.के.सिन्हा यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारात सुधारणा होणे गरजेचे असून सर्व परिपक्वता कालावधीचे सरकारी रोखे नियमितपणे बाजारात आल्यास खेळत्या भांडवलात वाढ होऊन सुधारणांचे लक्ष्य साध्य करता येऊ शकेल, असे सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सांगितले. डेरिव्हेटिव्हज बाजाराचे यश हे मूळ भांडवल बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे भांडवल बाजारात पुरेशी रोकड सुलभता असणे गरजेचे आहे. त्यामुळे मूळ भांडवल बाजारात सुधारणा होणे आवश्यक आहे. व्याजदर वायदे बाजारात पुरेशी रोकड सुलभता येण्याच्या दृष्टीने बाजारात सर्व परिपक्वता कालावधीचे सरकारी रोखे नियमितपणे बाजारात येण्याची गरज असल्याचे मत सिन्हा यांनी व्यक्त केले. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील व्याजदर वायदे व्यवहारांचा (इंटरेस्ट रेट फ्युचर्स) शुभारंभ करताना ते बोलत होते. शेअर बाजारात व्याजदर वायदे व्यवसायात सरकारकडून बाजारात येणा-या सार्वजनिक रोख्यांपैकी जवळपास 34 टक्के रोखे हे बँकिंग यंत्रणेकडे आहेत. जोपर्यंत बँका यात सहभागी होत नाहीत, तोपर्यंत अपेक्षित यश साध्य करण्याच्या संधी मर्यादित असल्याचे स्पष्ट करून सिन्हा यांनी गेल्या 11 वर्षांत अशा प्रकारची उत्पादने बाजारात आणण्याचे प्रयत्न फोल गेले असल्याकडे लक्ष वेधले.
अधिकाधिक रोकडसुलभता कशी पुरवावी यावर भांडवल बाजार नियंत्रकांचा विचार सुरू असल्याचे सांगून सिन्हा यांनी भविष्यात कंपनी रोखे बाजारपेठ विकसित करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक, सेबी आणि शेअर बाजार एकत्रितपणे करेल, असा आशावाद व्यक्त केला. व्याजदर वायदे व्यवहार सुरू करणारा एनएसई हा देशातील दुसरा शेअर बाजार ठरला आहे.
इंटरेस्ट रेट फ्युचर्सला चांगले भविष्य
विदेशी गुंतवणूकदार संस्था, बँका, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंडांच्या सहभागामुळे व्याजदर वायदे व्यवहारांना चांगले भविष्य असल्याची प्रतिक्रिया सिन्हा यांनी अनावरणप्रसंगी बोलताना व्यक्त केली. व्याजदर वायदे व्यवहार हे एक सोपे आणि चांगले उत्पादन असून एक रोखा आणि दहा वर्षे मुदतीचे रोखे, असे दोन पर्याय आम्ही दिलेले आहेत. सर्वच शेअर बाजारांनी रोख्याचा पर्याय स्वीकारला असून त्याला चांगले यश मिळेल, असे सिन्हा म्हणाले.