आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या पेट्रोल कार होणार अधिक स्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोलच्या भडकणार्‍या किमतीच्या झळा आता जुन्या पेट्रोल कारच्या (प्री-ओन्ड) बाजारपेठेला बसत आहेत. जुन्या कारच्या बाजारातील विविध कार कंपन्यांच्या वितरकांकडे चौकशीचे प्रमाण 50 टक्के घटले आहे. त्यातही जुन्या पेट्रोल कारबाबत चौकशी करणार्‍यांचे प्रमाण नगण्य झाले आहे. यामुळे जुन्या पेट्रोल कारच्या किमतीत 5 ते 10 टक्के घट येण्याची शक्यता आहे. याउलट, जुन्या डिझेल कारबाबत अधिक चौकशी होत आहे. मात्र, या वितरकांकडे जुन्या डिझेल कार पुरेशा प्रमाणात नाहीत.

वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या कार बाजारात 85 ते 90 टक्के पेट्रोल कारचे प्रमाण आहे. जुन्या कार बाजारातील पेट्रोल कारच्या किमती 5 ते 10 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. साठा पातळीत वाढ झाल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही आठवडे विक्रीत वाढ झाली नाही तर वितरकांना 5 ते 10 टक्के किमती कमी करण्याशिवाय पर्याय नाही. दिल्लीस्थित मारुती-सुझुकीच्या प्री-ओन्ड कारभाराचे ट्रू व्हॅल्यू वितरक टी.आर. साहनी मोटर्सच्या एका कर्मचार्‍याने सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांत पेट्रोल कारच्या चौकशीत 40 ते 50 टक्के घट झाली आहे. पेट्रोलच्या किमती वाढल्यानंतर अल्टो, वॅगन-आर यांसारख्या छोट्या कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यासारखी स्थिती आहे. गुडगाव येथील मारुतीचे वितरक विपुल मोटर्सच्या एका विक्री अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या काही दिवसांत पेट्रोल कारच्या विक्रीत मोठी घट आली आहे. त्यातच डिझेल मॉडेल्सची संख्या फारशी नाही. त्यामुळे आगामी काळात साठा वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील ह्युंदाईच्या एका वितरकाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारच्या बाजारात सुस्ती होती. त्यातच पेट्रोलचे भाव भडकल्याने विक्री ठप्प झाल्याचे चित्र आहे. वितरकांना साठा कमी करण्यासाठी किमती 5 ते 10 टक्क्यांनी कमी कराव्या लागणार आहेत.