आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी उद्योजकतेचे सुरक्षा कवच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावसायातील धडा आपण नेमका गिरवला तर एका आगळ्यावेगळ्या व्यवसायाची गुरुकिल्ली केव्हा हातात येऊन पडते ते कळतही नाही. मुंबईत अंधेरीत राहणारे विजय आंबेरकर यांच्याबाबतीतही नेमके हेच घडले. नोकरीतील प्रत्यक्ष फील्डवर केलेल्या कामाचा अनुभव आणि त्याला मिळालेली इलेक्ट्रॉनिक डिप्लोमाची साथ यातून त्यांनी सुरक्षा उपकरण प्रणाली व्यवसायात आता चांगलाच जम बसवला आहे. आंबेरकर यांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्यांसारखीच. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा घेतल्यानंतर त्यांनी नोकरी पत्करली. इन्स्ट्रुमेंट अ‍ॅँड सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड, डिजिटल मल्टिमीटर बनवणारी ‘मेको’, लोटस टेलिव्हिजन अशा कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली.

नोकरी करूनही घरचे भागणार नव्हते. त्यामुळे व्यवसाय करणे हाच त्यावर पर्याय होता. आर्थिक बाजू बेताची असतानाही त्यांच्या मनात व्यवसाय करण्याचे चक्र फिरत होते. त्याची सुरुवात संगणक दुरुस्ती आणि देखभाल याने झाली. टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, मॉनिटरची दुरुस्ती आणि सेवा असे या व्यवसायाचे स्वररूप होते. सुरुवातील्ला एका कंपनीचे कॉम्प्युटर सर्व्हिसिंगचे काम त्यांना मिळाले. ते करतानाच क्रॉम्प्टन ग्रीव्हजसारख्या मोठ्या कंपनीचे कंत्राट मिळाले. त्यामुळे त्यांना संगणक क्षेत्रातील ब-याच गोष्टी शिकायला मिळाल्या. याच अनुभवातून त्यांनी मग कॉम्प्युटर असेम्बल्ड करायला सुरुवात केली. आंबेकरांच्या व्यवसायाला 1995 नंतर ख-या अर्थाने आकार मिळायला लागला. संगणकाचा व्यवसाय करीत असतानाच त्यांनी डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग कार्डचे काम सुरू केले. हे कार्ड संगणकात टाकल्यानंत ते रेकॉर्डिंग करते.

सुरक्षा उपकरण व्यवसायातील त्यांचे हे पहिले पाऊल होते. वेगवेगळ्या दुकानांमध्ये ही प्रणाली बसवत असतानाच या व्यवसायात भविष्यात मोठ्या संधी असल्याचे त्यांना जाणवले. मग त्यादृष्टीने त्यांनी सुरक्षा प्रणाली बाजारपेठ, सुरक्षा उपकरणे यांचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आपल्या व्यवसायात त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. पण इतकी महाग सुरक्षा उपकरणे कोणी घेणार नाही हे ओळखून आंबेरकर यांनी निविदा भरून कामे घेण्यास सुुरुवात केली. त्या वेळी त्यांना बॅँक ऑफ महाराष्‍ट्र (100 शाखा), बेस्ट (पाच बस डेपो), अपना बजार, डेक्कन
मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅँक, म्हाप्रा फार्मास्युटिकल्स (दमण), शाळा, रुग्णालये, बॅँका आदी विविध ठिकाणी सुरक्षा प्रणाली बसवण्यात यश मिळवले.


आता आंबेरकर हे स्वत:च्या बळावर हा व्यवसाय वाढवत नेला असून त्याची उलाढाल 70 ते 80 लाखाच्या घरात गेली आहे. पण अर्थात हा प्रवास इतका सोपा नव्हता. बॅँकेकडे तारण ठेवून त्यांनी कर्ज घेतले प्रसंगी मित्रांनी केलेली आर्थिक मदत यामुळेच त्यांचा सुरक्षा उपकरणांचा व्यवसाय वाढवला. मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला, बॅँकांमधील चो-या, दरोडे अशा परिस्थितीत सुरक्षिततेचे महत्त्व आता सगळ्यांनाच पटले आहे. त्यामुळे आंबेरकरांकडील सुरक्षा उपकरणांची चौकशी वाढली आहे. सीसीटीव्ही बसवणे प्रत्येकालाच गरजेचे वाटत आहे. सीसीटीव्हीमधील व्यक्तीची नेमकी ओळख व्हावी यादृष्टीने उत्पादनातील दर्जेदारपणा त्यांनी जपला आहे. विशेष म्हणजे आपल्या व्यवसायाची जाहिरातबाजी न करताही अनेक ग्राहकांपर्यंत ते पोहा९चले आहेत. मेहनत, वेगवेगळ्या अनुभवातून ज्ञानात पडलेली भर, ग्राहकांना समजावून सांगण्याचे कौशल्य या त्रिसूत्रीवरच यशस्वी व्यवसायाचा डोलारा उभा राहतो असे आंबेरकर आवर्जून सांगतात. अगदी जाता जाता त्यांचे मुंबई पोलिसांसाठी तयार केलेल्या सुरक्षा उपकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. पोलिसांना जर एखाद्या ठिकाणचे रेकॉर्डिंग करायचे असेल तर पूर्वी पोलिस व्हॅन एका जागी थांबवून आसपाच्या दुकानात वायर जोडून ते करावे लागायचे. पण आंबेरकर यांनी पोलिस व्हॅनमधील मोटारीच्या बॅटरीलाच ती वायर जोडली. त्यामुळे आता चालत्या पोलिस व्हॅनमधूनदेखील रेकॉर्डिंग करता येऊ शकते. सध्या दोन पोलिस व्हॅनमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सुरक्षा उपकरणांचे उत्पादन करून ती विकसित करणे खूप खर्चिक बाब आहे. त्यामुळे ही उपकरणे आयात करून गरजेनुसार त्यात तांत्रिक सुधारणा करत आंबेरकरांनी सुरक्षेचे हे शिखर सर केले आहे. त्यांच्या या अनोख्या उद्योजकतेमुळेच आजच्या असुरक्षिततेच्या वातावरणात हे अनोखे सुरक्षा कवच सर्वसामान्यांना मिळाले आहे हे खचित..!!