आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Gurantee Providing Aps; Go Whereever You Want

सुरक्षेची हमी देणारे अ‍ॅप्स; कुठे‍ही जा सुरक्षा आपल्याबरोबर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ऑनलाइन बाजारपेठेत अशी काही अ‍ॅप्स आली आहेत ,की ज्यामुळे एखादी व्यक्ती संकटात सापडली तर तिच्या जवळच्या व्यक्तींना ताबडतोब संदेश जाईल. मानवी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न जटील बनला आहे. हे सर्व लक्षात घेऊन आज अनेक अ‍ॅप्स बनवण्‍यात येत आहेत, ज्यांच्या सहाय्याने माणूस आपली सुरक्षा करू शकतो.


सर्कल ग्रुप्स सांगणार लोकेशन
सर्कल ऑफ सिक्स ग्रुप अ‍ॅप हा अ‍ॅंड्रॉईड अ‍ॅप आहे. याच्या सहाय्याने तुम्ही सहा लोकांचा सर्कल तयार करू शकता. कोणत्याही संकटात तुम्ही सापडलात, तर ते सर्कलमधील इतर सदस्यांना माहिती देते.