आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात रंगला सी-सॉचा खेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडक समभागांत अखेरच्या सत्रात झालेल्या खरेदीमुळे दिवसअखेर वाढीचे पारडे जड झाल्याने सेन्सेक्स वधारला. बुधवारी बाजारात सी-सॉचा खेळ चांगलाच रंगला. कधी तेजीचे पारडे जड तर कधी घसरणीचे पारडे जड असे चित्र होते. अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. अखेर सेन्सेक्स 22.42 अंकांच्या वाढीसह 19,245.70 वर बंद झाला. निफ्टीने 8.65 अंकांच्या कमाईसह 5822.25 ही पातळी गाठली.


सकाळच्या सत्रात ऑटो, ऊर्जा, सार्वजनिक उद्योग आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री केली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 15 समभागांना विक्रीचा फटका बसला. एचडीएफसी, मारुती सुझुकी, स्टरलाइट इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, हिंदाल्को या समभागांत तजी दिसून आली. तर इन्फोसिस, टीसीएस, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स आणि सन फार्मा या समभागांना विक्रीचा फटका बसला. रोमिंग माफक करण्याच्या निर्णयामुळे भारती एअरटेल, आर कॉम आणि आयडिया सेल्युलर या समभागात तेजी आली.