आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात सी-सॉ, तेजीचे पारडे जड; सेन्सेक्स 85 अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेअर बाजारात शुक्रवारी खरेदी-विक्रीचा सी-सॉ रंगला. कधी तेजीचे पारडे जड तर कधी विक्रीचे पारडे जड अशा या खेळात सत्राच्या शेवटी तेजीचे पारडे जड झाले. सेन्सेक्सने 84.98 अंकांची कमाई करत 19495.82 ही पातळी गाठली. दुपारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या समभागांतील खरेदीने बाजारातील तेजीला बळ मिळाले. निफ्टी 30.95 अंकांच्या कमाईसह 5867.90 पातळीवर स्थिरावला.


दिग्गज समभागांतील खरेदीने बाजारात तेजी आल्याचे मत ब्रोकर्सनी व्यक्त केले. विदेशी वित्तीय संस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारातील तेजी टिकून राहिली. युनिलिव्हर या अँग्लो-डच कंपनीने हिंदुस्तान लिव्हर कंपनीतील हिस्सा वाढवल्याने त्याच्या समभागांनी विक्रमी वाढ नोंदवली. सिगारेटच्या किमती वाढल्याने आयटीसीचे समभाग वधारले. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरल्याचा परिणाम बाजारातील तेजीवर झाला.