आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडक समभागांनी बाजाराला तारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेत आणि टीसीएस, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक यांसारख्या निवडक समभागातील खरेदीने बुधवारी बाजाराला तारले. ऑटो, रिअ‍ॅल्टी आणि आयटी क्षेत्रातील समभागांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. रिफायनरी व एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांतील नफावसुलीने बाजारातील तेजीला वेसण लागली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 49.10 अंकांनी वाढून 20,261.03 वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 21.50 अंकांनी 6022.40 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 17 समभाग वधारले, 12 घसरले, तर सिप्ला स्थिर राहिला.
आशियातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र वातावरण दिसले. जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार वधारले, तर हाँगकाँग, सिंगापूर आणि तैवान बाजार घसरले. नववर्षानिमित्त चीनचा बाजार सात फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. युरोपातील प्रमुख बाजारांत तेजीचे वातावरण होते. देशातील बाजारात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी 1234.02 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली.