आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेसेज पाठवा... आपल्या भावनाही पोहोचवा अनोख्या रीतीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोबाइलवरून नेहमीच्या पद्धतीने एसएमएस पाठवायचा तर पैसे पडतात, पण व्हॉट्स अ‍ॅप, फ्रीटूएसएमएस, फुलऑनएसएमएस,टेक्सटू, व्हायबर या सारखी चकटफू सेवा देणारी अ‍ॅप एसएमएसप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे या अ‍ॅपच्या मदतीने एसएमएस पाठवण्याचा कल वाढतोय. या सर्व अ‍ॅपच्या भाऊगर्दीमध्ये आता गपशप टेक्नॉलॉजीजच्या नव्या अ‍ॅपची भर पडली आहे. नुसतेच मेसेजिंग नाही तर आपल्याला कलात्मक पद्धतीने भावना व्यक्त करण्यासाठी असलेली खास आयकॉन्स हे या अ‍ॅपची खासियत म्हणता येईल. विशेष म्हणजे केवळ अ‍ॅँड्रॉइडच नाही तर आयओएस, ब्लॅकबेरी आणि नोकिया एस40 मोबाइलवर हे अ‍ॅप सहजपणे वापरता येऊ शकते


गपशपच्या या नव्या अ‍ॅपमधील हे अन्य मेसेंजर्स अ‍ॅपच्या तुलनेत अधिक आकर्षक आणि आकाराने मोठे आहेत. ते खेळ, खाद्यपदार्थ, चित्रपट, संस्कृती, धर्म, प्रादेशिक आशय आणि इतर अनेक लोकप्रिय सूत्रांवर आधारित आहेत. एसएमएस प्रेमींसाठी या अ‍ॅपवर आयकॉन्सची ऑनलाइन लायब्ररीदेखील आहे.


गपशपने वापरकर्त्यांना त्यांचे स्वत:चे इमोटिकन्स अपलोड करण्याची संधी देऊ केली आहे, जी सुविधा इतर कोणत्याही मेसेंजरमध्ये नाही. त्यामुळे वापरकर्त्याला स्वत:च्या खास वैयक्तिक पद्धतीने व्यक्त होता येते. गपशप मेसेंजर अ‍ॅप स्मार्ट-फोन्स आणि फीचर-फोन्समधील दुवा आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला प्रत्येक मोबाइल उपकरणापर्यंत पोहोचणे शक्य होते. या अ‍ॅपमध्ये सार्वजनिक आणि खासगी मेसेजिंग एकाच ठिकाणी एकवटलेले असल्याने प्रत्येक मित्र आणि फॉलोअरपर्यंत पोहोचता येते.


स्मार्ट-फोन वापरणा-या व्यक्तींना डेटा चॅनेलचा वापर करून मेसेजेस पाठवले जातात/मिळतात, तर फीचर फोन्स वापरणा-या व्यक्तींना एसएमएसच्या स्वरूपात संदेश मिळतात/पाठवले जातात. ज्याला मेसेज पाठवला आहे, त्या व्यक्तीकडे अ‍ॅप नसेल तर गपशप त्यांना मोफत टेक्स्ट मेसेज पाठवते. या अ‍ॅपचा वापर करून अमर्याद टेक्स्ट मेसेजेस मोफत पाठवता येतात. यासाठी वापरकर्त्याला एखादी एसएमएस योजना खरेदी करण्याचीदेखील गरज नाही.

स्वत: तयार करा आयकॉन्स
आपल्या गरजेनुसार अ‍ॅपला वैयक्तिक आवडीचे रूप देण्याकरिता कोणतीही व्यक्ती कस्टम आयकॉन्सचा उपयोग करू शकते. तसेच आपली शाळा, कॉलेज, क्लब किंवा कम्युनिटी अशा सूत्रांवर आधारलेल्या थीम्सकरिता आयकॉन्स तयार करू शकतात. व्यवसाय आपले ब्रँड्स आणि उत्पादने सादर करण्याकरिता आयकॉन्स निर्माण करू शकतात. तसेच सरकारी किंवा बिगर सरकारी संस्थादेखील महत्त्वपूर्ण थीम्सना सादर करण्याकरिता त्यांचा वापर करू शकतात. आयकॉन्समुळे मोबाइल वापरकर्त्यांना या थीम्समध्ये खेळकररीत्या समाविष्ट होणे आणि त्यांचे आदानप्रदान आपल्या मित्रांबरोबर करणे शक्य होते.