आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स पुन्हा उसळला, निफ्टी ८६०० वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून चारी मुंड्या चीत झालेल्या भाजपकडून आता आर्थिक सुधारणांच्या पावलांना वेग येईल या अपेक्षेने बुधवारी बाजारात तेजी आली. भांडवली वस्तू, धातू, ऊर्जा आणि बँकांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. चांगल्या खरेदीमुळे सेन्सेक्स १७८.३५ अंकांनी वाढून २८,५३३.९७ वर पोहोचला. निफ्टीने ६१.५८ अंकांच्या कमाईसह ८,६२७.४० पर्यंत मजल मारली. निफ्टीने ८६०० ही महत्त्वाची पातळी पुन्हा पार केली. आता सर्वांच्या नजरा २८ तारखेला जाहीर होणा-या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.

सात दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजाराला तेजीचा सूर गवसला. तीच खेळी पुढे चालवत बुधवारी सलग दुस-या दिवशी बाजाराने तेजी नोंदवली. बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत वाढ दिसून आली.