आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स पुन्हा 20 हजारांवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सिंगापुरात गारचे भूत गाडले, असे विधान केल्याने गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली. भारती एअरटेल, आयटीसी आणि टाटा पॉवर या समभागांवर गुतंवणूकदारांच्या उड्या पडल्या आणि मागील दोन सत्रे घसरलेल्या सेन्सेक्सने पुन्हा 20 हजारांवर झेप घेतली. बुधवारी दिवसभराच्या सत्रात निर्देशांकात अनेक चढ-उतार आले. सत्राअखेर सेन्सेक्स 45.05 अंकांनी वाढून 20,026.61 या पातळीवर बंद झाला, तर निफ्टीने 5.80 अंकांच्या कमाईसह 6,054.30 ही पातळी गाठली.

सकाळच्या सत्रात बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. दिवसभरात सेन्सेक्स 20,058.07 ते 19,920.91 या कक्षेत फिरला.टू-जी डाटा प्लॅनच्या किमती वाढल्याने भारती एअरटेलने त्यांच्या मोबाइलचे कॉल दर वाढवले. त्यामुळे भारती एअरटेलच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. डिसेंबर तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे आयटी, बँकिंग आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी होती.
येन चलनाबाबत बँक ऑ फ जपानने घेतलेल्या निर्णयामुळे आशियातील बाजारात नरमाईचे वातावरण होते. युरोपातील बाजारात संमिश्र कल दिसून आला.