आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स आणि निफ्टीचा नवा विक्रम, मारुती-सुझुकीनेही गाठली नवी उंची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज पुन्हा एकदा सेन्सेक्सने उंच उडी घेतली आहे. सेन्सेक्सने पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढत एक नवी उंची गाठली आहे. आज सेन्सेक्सने 22,040.72 चा टप्पा गाठला आहे. तर निफ्टीने देखील सर्व विक्रम मोडीत काढत 6,574.95 अंकाला स्पर्श केला आहे.
बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स 40 अंकानी वाढीसोबत 21,849.65 वर उघडला. शुक्रवारी सायंकाळी सेन्सेक्स 21,809.80 अंकांवर बंद झाला होता. आज सकाळी 10.55 मिनीटांनी सेन्सेक्स 162 अंकांनी वाढून 21,972.65 वर पोहोचला.
दुसरीकडे निफ्टी मध्ये देखील 28 अंकाची वाढ झाली. त्यामुळे 6,532.45 वर निफ्टीची सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी 6,504.20 अंकावर बंद झाला होता. आज सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा त्यात 48 अंकांनी वाढ होऊन 6,552.75 वर बाजार सुरु आहे.
मारुती-सुझूकीने गुजरात प्रकल्पासाठी अल्प भागधारकांकडून परवानगी घेणार असल्याच्या बातम्यांनी मारुती सुझूकीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. आज बाजार सुरु झाला तेव्हा मारुतीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वृद्धी झाली त्यामुळे त्यांनी 1899.90 अंकाला स्पर्श केला.