आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स : तेजीचे द्विशतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रुपयाच्या घसरणीला वेसण घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने उचललेल्या पावलांमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. उत्साही गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे गेल्या सात सत्रांतील घसरण मागे टाकत गुरुवारी बाजाराने तेजीचा उत्साह अनुभवला. रिझर्व्ह बँकेच्या पावलाने रुपयालाही बळ मिळाले. तर लग्नसराईमुळे सराफा बाजार तेजीने उजळला.
सेन्सेक्स, निफ्टी तेजीत : अमेरिका फेडरल रिझर्व्ह आर्थिक मदतीचा झरा सुरू ठेवणार असल्याचे संकेत आणि आर्थिक प्रणालीतील रोखता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने टाकलेले पाऊल यामुळे गुरुवारी बाजारात तेजीचे उधाण आले. सेन्सेक्स 205.02 अंकांच्या तेजीच्या द्विशतकासह 20,399.42 वर बंद झाला. निफ्टीने 66.55 अंकांच्या कमाईसह 6,056.15 ही पातळी गाठली.
व्याजदरांशी निगडित ऑटो, बँक आणि रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी चांगली कमाई केली. आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्स या समभागांतील तेजीने सेन्सेक्सला बळ दिले. मात्र, नंतर महागाईचे आकडे जाहीर झाले आणि गुंतवणूकदारांनी नफेखोरीकडे मोर्चा वळवला.
तेजीचे मानकरी : टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, हीरो मोटोकॉर्प
टॉप लुझर्स : कोल इंडिया, सिप्ला, सन फार्मा, टीसीएस, गेल इंडिया.
आज सुटी
मोहर्रमनिमित्त शुक्रवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराला सुटी आहे.