आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांकाच्या तेजीला लगाम!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या तीन दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीमध्ये झालेल्या 400 अंकांच्या कमाईला नफारुपी विक्रीचे गालबोट लागून सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली. औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याच्या अगोदरच रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, एचडीएफसी बॅँक या बड्या समभागांच्या झालेल्या विक्रीत बाजार घसरला.
दिवसभरात सेन्सेक्सने 20 हजार अंकांची पातळी गाठली होती. परंतु ती फारकाळ तग धरू शकली नाही, नफारुपी विक्रीच्या माºयात सेन्सेक्स दिवसअखेर 51.14 अंकांनी घसरून 19,939.04 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 19.15 अंकांनी घसरून 6050.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला.